नवा संकल्प

आज आपण प्रत्येक व्यक्ती फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो आणि ती म्हणजे आपलं करियर. आपण सर्व यामागे इतके स्वार्थी झालोय कि कधी कधी असं वाटत हे सोडून या जगात दुसरं काही नाहीच. खरंय आपण करायला हवा याचा विचार कारण प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं. आपल्यासाठी आपण नाही तर कोण मदत करणार. पण हे सगळं करण्यामागे आज आपण एक गोष्ट विसरतोय आणि ती म्हणजे आपली नाती जपायला. जी काही आपली रक्ताची नाती आहेत ते लोक तर आपल्या पाठीशी असतातच अशी आपणच आपली समजूत घातलीय. खरंय त्यांच्या तितक्या अपेक्षा पण आपल्याकडून नसतात. म्हणून का आपण त्यांना नाकारायचं ? तर नाही. मी कुठेतरी या बाबतीत चुकते हे मला कळलं. मी नेहमी कमी बोलते याचा अर्थ असा नाही कि मी कुणालाही महत्त्व देत नाही. प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. तर या सर्व गोष्टींमधून एकच समजून येतंय कि दिवसेंदिवस आपण आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या नादात आपली सर्वात जवळची लोक विसरत चाललोय. हे सर्व ठीक आहे. हा झाला एक मुद्दा. सर्वांना आनंदी राहायला आवडतं. आनंदी रहायचं म्हटलं कि आपल्या मनाचा संतोल महत्वाचा. मग त्यासाठी काय करायचं तर पैसे कमवायचे, करिअर घडवायचं बस एवढाच का तर नाही. जिथेही कुठे आपण जाऊ तर आपल्याला नवीन लोक मिळणार. हा तर निसर्गाचा नियमच आहे. तर प्रत्येक मिळणाऱ्या नवीन लोकांबरोबर जुळवून घेणं हि आपली जबाबदारी. हो कि नाही. हे सगळं काही मला कळायचं म्हणूनच आज माझे बरेच चांगले ओळखीचे लोक आहेत ज्यांच्याशी मी जुळवून घेते. पण नेहमी मनात एक भीती असायची कि मला कधीच कुणाशी घट्ट मैत्री करता आली नाही जी आजही येत नाही. कारण माझ्या मते एक चांगली मैत्री आली कि त्यामागे खूप अपेक्षा पण येणार. प्रत्येकाच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही. सर्वात शेवटी एवढंच कि आनंदी राहायचं असेल तर फक्त नाती बनवून चालत नाही तर त्याबरोबर ती जपायला येन हेही तितकंच महत्वाचं. आजसुद्धा कुठेतरी मी नाती बनवायला घाबरतेच. पण तरीही आयुष्य खूप सुंदर आहे कारण एकटी राहायची सवय झालीये. तात्पर्य एवढंच कि प्रत्येकाला कुणाची ना कुणाची गरज कधीना कधी भासतेच. त्यामुळे ज्याही लोकांना तुम्ही भेटाल त्यांच्याशी नीट राहणे गरजेचे. प्रत्येक मैत्री हि घट्ट असलीच पाहिजे असं नाही.

# Happy Life 

Comments

Anonymous said…
छान..लेखाचा'साधेपणा'मनाला भावला.'माझा लेख सर्वोत्तम असावा'हा अट्टाहास मुळीच दिसून आला नाही. मनातले विचार (unfiltered) मूळ स्वरूपात मांडले असावेत आपण..
Anonymous said…
भारतासारख्या देशात 'व्यक्तिस्वातंत्र्य' ही संकल्पना आता कुठे रुजू पाहत आहे.मैत्रीचे रूपांतर नात्यात होणे ही बाब आपल्याकडे रसायनशास्त्रातल्या आयनिक बंधासारखी(ज्यात कुणा एकाला स्वतःच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा एखाद्या इलेक्ट्रॉनप्रमाणे त्याग करावा लागतो..)आहे!! अर्थात काही अपवाद देखील आहेत. परंतु सगळीकडे थोड्या फार प्रमाणात हेच चित्र दिसते. या पार्श्वभूमीवर तुमचा लेख ठळकपणे नजरेत भरतो.. मैत्रीपूर्वी दोन/जास्त व्यक्तींमध्ये एक न दिसणारी भिंत/रेषा असते. मैत्री घट्ट होत जाते तशी ही रेषा पुसट होत जाते अन् व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच सुरू होतो..हे टाळण्यासाठी एक प्रकारची 'तटस्थता' गरजेची असते..(अल्पावधीतच आपले मित्र बनलेले)रेल्वेतील सहप्रवासी व आपण यांच्यातली 'तटस्थता'..चिवड्यातील महत्त्वाचे घटक असणाऱ्या,तरीही स्वतःचं अस्तित्व राखून ठेवणाऱ्या पदार्थांची 'तटस्थता'..माझ्या मते अशी तटस्थता तुमच्या कडे आहे..हेच प्रस्तुत लेखातून दिसून येते. मी कित्येक दिवसांपासून अशी तटस्थता अंगी बाणवण्याचा प्रयत्न करतोय पण व्यर्थ!! तुम्ही चांगल्या ओळखी बनवण्यात(तेही emotionally detached राहून!!)यशस्वी झालात.मला काही ते आजवर जमले नाही, म्हणून मी मुळातच माझ्या मित्रांची संख्या मर्यादित ठेवली!!
असो..लेख चांगला होता.लेखातल्या गोष्टी वाचकाला स्वतःशी relate करून पाहाव्याशा वाटत असतील तर तो लेख तितकासा वाईट नाही हे लेखकाने ओळखावे!!!
Thank you so much for all the support. Keep supporting. It is totally true that I increased my lots of contacts and I'm keeping it by emotionally detached from any particular person. But whatever I'm facing in my life, it is forcing me to pen down each and every moment. And I'm trying to make it successful. Once again thank you.

Popular posts from this blog

Engage into thoughts !!!

Make a quarantine productive