Posts

Showing posts from January, 2020

नवा संकल्प

आज आपण प्रत्येक व्यक्ती फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो आणि ती म्हणजे आपलं करियर. आपण सर्व यामागे इतके स्वार्थी झालोय कि कधी कधी असं वाटत हे सोडून या जगात दुसरं काही नाहीच. खरंय आपण करायला हवा याचा विचार कारण प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं. आपल्यासाठी आपण नाही तर कोण मदत करणार. पण हे सगळं करण्यामागे आज आपण एक गोष्ट विसरतोय आणि ती म्हणजे आपली नाती जपायला. जी काही आपली रक्ताची नाती आहेत ते लोक तर आपल्या पाठीशी असतातच अशी आपणच आपली समजूत घातलीय. खरंय त्यांच्या तितक्या अपेक्षा पण आपल्याकडून नसतात. म्हणून का आपण त्यांना नाकारायचं ? तर नाही. मी कुठेतरी या बाबतीत चुकते हे मला कळलं. मी नेहमी कमी बोलते याचा अर्थ असा नाही कि मी कुणालाही महत्त्व देत नाही. प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. तर या सर्व गोष्टींमधून एकच समजून येतंय कि दिवसेंदिवस आपण आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या नादात आपली सर्वात जवळची लोक विसरत चाललोय. हे सर्व ठीक आहे. हा झाला एक मुद्दा. सर्वांना आनंदी राहायला आवडतं. आनंदी रहायचं म्हटलं कि आपल्या मनाचा संतोल महत्वाचा. मग त्यासाठी काय करायचं तर पैसे कमवायचे, करिअर घडवायचं बस एवढाच ...